सागवान तस्कर अडकले वन विभागाच्या जाळ्यात… डोंगरगाव डेपो येथे कारवाई..!
कोहमारा :- . सडक अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव डेपो परिसरात गुप्त माहितीच्या आधारे वन विभागाने दिनांक 20 रोजी पहाटे चार च्या सुमारास राबविलेल्या विशेष मोहिमेत अवैध सागवान लाकूड वाहतुकीचा प्रयत्न हाणून पाडीत बेलोरा सह तीन संशयीतांना ताब्यात घेत मौल्यवान सागवान लाकूड व वाहन जप्त करण्यात आले आहे.. प्राप्त माहितीनुसार सह व्याघ्र प्रकल्प क्षेत्र डोंगरगाव डेपो परिसरात काही दिवसापासून संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती त्यानुसार वन विभागाच्या पथकाने रात्रीपासून परिसरात पाडत ठेवली होती आज दिनांक 20 जूनला पहाटे चर्चा सुमारास साले धारणी मार्गावरून जाणाऱ्या एका बोलोरो पिकप वाहन क्रमांक एम एच ३५ए.जे११५४ वाहनाला थांबवून तपासणी केली असता वाहनात लपवून ठेवलेले मोठ्या प्रमाणावर सागवान लागले आढळले लाकूड वाहतूक करण्याचे कोणताही अधिकृत परवाना नसल्याने सदर वाहन लाकडा सह ताब्यात घेण्यात आले असून संसईत तीन इसमांना ताब्यात घेऊन व न कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू आहे सदरची कारवाई क्षेत्र सहाय्यक कुमारी व्हि.बी.रहिले आणि सी एस डोरले यांच्या मार्गदर्शनाखाली पवन कांबळे मेहमूद सय्यद विवेक काईट सहसराम हटवार माधव मुसळे वनिता ब्राह्मणकर यशवंत शेंडे श्रीकांत बनसोड आणि समीर बनसोड यांनी भाग घेतला वन विभागाच्या या कारवाईमुळे सागवान लाकूड तस्करांचे धावे दना आणले असून अवयव साबण वृक्षतोड व तस्करी विरोधात आणखी कठोर पाऊले उचलण्याचे संकेत वनविभागाच्या वतीने देण्यात आले आहे
