राजकीय

मुंबई अधिवेशनात सांगवारी उपसा सिंचनाचा प्रश्न उपस्थितआमदार भोंडेकर यांनी केली मागणी

भंडारा: – मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशन दरम्यान आज आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा जिल्ह्यातील संगवारी उपसा सिंचन योजनेचा प्रश्न उपस्थित केला. या करिता लागणारा निधी अर्थ विभागात थांबला असल्याचे त्यांनी सदनाच्या लक्षात आणून दिले.

उल्लेखनीय आहे की, भंडारा जिल्ह्यातील शेतकरी सिंचनाच्या अभावी मुळे हवालदिल होत असल्याचे आम. भोंडेकर यांच्या ध्यानी आले. त्या करिता 2020 या वर्षी त्यांनी गोसे प्रकल्पाच्या बॅकवॉटर मधूनच संगवारी प्रकल्पाच्या माध्यमाने सिंचन व्यवस्था करण्या करिता प्रस्ताव शासन दरबारी सादर केला होता, ज्याला 2022 मध्ये मान्यता सुधा मिळाली. हा प्रस्ताव प्रत्येक विभागातून मंजूर होऊन आता आर्थिक मंत्रालयात पोहोचला आहे. ज्यावर निर्णय होण्यास दिरंगाई होत आहे. आज मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करीत आम. भोंडेकर म्हणाले की भंडाऱ्याला पेंच प्रकल्पातून पाणी दिल्या जाते, हा प्रकल्प 70 ते 80 किलोमीटर असल्याने पूर्णपणे सिंचन होणे शक्य होत नाही. करिता 2020 मध्ये सांगवारी उपसा सिंचनचा प्रस्ताव टाकला. या मुळे भंडारा व मोहाडी तालुक्यातील 50 ते 60 गावांतील सात हजार हेक्टर शेतीला लाभ मिळू शकेल. हा प्रस्ताव विविध कमेटी ची मंजुरी घेत आर्थिक शाखेत पोहोचला. परंतु येथून पुढे जात नाही. या करिता आम. भोंडेकर यांनी विनंती केली की ही फाईल फास्ट ट्रॅक मध्ये टाकण्यात यावी. आणि पुढील दोन महिन्यात याचे टेंडर निघतील अशी अपेक्षा व्यक्त करीत वरील दोन्ही तालुक्यातील 7000 हेक्टर शेतीला सिंचन मिळू शकेल असे म्हणाले.