गोंदिया:- गोजू रुयू गोकुई कराटे डो अँड स्पोर्ट्स क्योंकाई, कटंगी कला येथे गुरुपौर्णिमा विशेष गुरुपूजन सोहळा उत्साहात संपन्न
कटंगी कला येथे गोजू रुयू गोकुई कराटे डो अँड स्पोर्ट्स क्योंकाई यांच्या वतीने गुरुपौर्णिमा विशेष गुरुपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गुरु वंदनेने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करत पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतले. यावेळी Sensei जनार्दन कुसराम (Black Belt 5th Dan) यांनी गुरुचे जीवनातील महत्त्व, शिस्त, संस्कार, आत्मविश्वास आणि कराटेच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सर्व विद्यार्थ्यांनी कराटे गणवेशात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. गुरु-शिष्य परंपरेचे जतन करत हा सोहळा प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरित्या पार पडला.
शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
