प्रधानमंत्रीच्या जन्मदिनानिमित्त केले वृक्षारोपण
गोंदिया :- सेवा संकल्प अभियानांतर्गत ग्रामपंचायत कटंगी येथील मोक्षधाम परिसरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त पर्यावरणाचे रक्षणासाठी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अविनाश वराडे, जितेश टेंबरे, मोनू बेस, बंटी लिल्हारे, चंद्रसेन डोनेकर, सदाशिव वाघाडे, राजेश श्रीभद्रे, राजेश बनवते, प्यारे टेंबरे आदी गावकऱ्यांनी मिळून विविध प्रकारचे फळझाडांचे रोपण करून पर्यावरण समृद्ध करण्याच्या दृष्टीचे कार्य केले आहे. यावेळी ‘वृक्ष लगाये, पर्यावरण बचाये और स्वस्थ समाज बनाये’ असा संदेश देण्यात आला तसेच लावण्यात आलेल्या झाडांची योग्य निगा राखण्याच्या संकल्प देखील घेण्यात आले.
