गुन्हेगारी बातमी

डीवायएसपी कार्यालयाच्या नावावर वाहन चालक शेंडे करतोय सक्त वसुली?

आमगाँव/गोंदिया :- उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव यांचे वाहन चालक शेंडे हे मागील अनेक वर्षापासून उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय आमगाव येथे वाहन चालक या पदावर कार्यरत असून त्यांचे विविध कारणामे आता पुढे येऊ लागले आहेत.

सालेकसा, आमगाव, गोरेगाव या तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या नावाचा वेगळाच संदेश आहे. या परिसरात अवैध धंद्यावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने सदर वाहन चालक शेंडे हा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पदाचा दुरुपयोग करत अनेक ठिकाणी अवैध वसुली करत असल्याचे माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे. त्यावेळी प्रत्येक ठिकाणावर जाण्याचे त्याचे टाइमिंग ठरले आहे. त्या विशिष्ट टाइमिंग मध्ये संबंधित ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यास सदर वाहन चालक शेंडे हा सिविल पोशाखात सहजगत्या मिळू शकतो.

मागील आमगाव येथे झालेल्या एका कारवाईत डीवायएसपी ऑफिस मधील कर्मचाऱ्यांनी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यास पकडले असता दोशीवर नाममात्र कारवाई केली असेल पण त्यास पकडणाऱ्या कर्मचाऱ्यावर दबाव टाकत असल्याचे पुढे आले आहे. असे अनेक प्रकार मागील काही वर्षाच्या कार्यकाळात पाहायला मिळाले आहे त्यामुळे यापुढे एखादे प्रकरण पुन्हा पुढे आल्यास वरिष्ठ स्तरावर त्याचे नवल वाटायला नको. या प्रकरणांची माहिती संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या सक्त वसुलीच्या हरकतीमुळे पोलीस विभागाच्या प्रतिमेला ठपका लागू नये इतकेच.