विदर्भ

पंपनादुरुस्तीमुळे पोलीस स्टेशनला पाणीपुरवठा बंद?

रावणवाडी /गोंदिया :- पोलीस स्टेशन रावणवाडी येथे मागील एक आठवड्यापासून मोटार पंप नादुरुस्त असल्यामुळे तेथील कर्मचारी तसेच फिर्याद नोंदवण्यासाठी येत असलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

या बाबीचे अधिक माहितीसाठी पोलीस निरीक्षक रामदास शेवते यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. मिळालेल्या माहितीनुसार मागील एक आठवड्यापासून पाण्याचा पंप जळाल्यामुळे पिण्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे. काही कर्मचाऱ्यांनी पंप दुरुस्तीसाठी मिस्त्रीला बोलवले असता संबंधित अधिकाऱ्याने त्यास आल्या पावली परत पाठवण्याची माहिती आहे.

सामान्यतः प्रत्येक व्यक्ती प्रवासात किंवा इतर कार्यालयाच्या ठिकाणी जात असताना अनेकदा पाण्याची बॉटल घेऊन काही काळापुरता पाणीसाठा आपल्याकडे जपून ठेवतात मात्र त्याला उपाय म्हणता येणार नाही. पाण्याअभावी जीवन कल्पने पलीकडचे असले तरीही सदर कार्यालयात पाण्याची उपलब्धता कधी होईल यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.