सामाजिक

पुण्यतिथीनिमित्त भौतिक परिवाराकडून रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनदान

गोंदिया : – दादुभाऊ अर्जुन भौतिक व पार्बता दादुभाऊ भौतिक यांच्या संयुक्त पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी (ता. २०) गोंदिया येथील स्थानिक गंगाबाई स्त्री रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजनदानाचा उपक्रम राबविण्यात आला.

कुंभारेनगर येथील अॅड. एन. डी. भौतिक व त्यांच्या परिवाराच्या वतीने हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांसोबत राहणाऱ्या नातेवाईकांना या माध्यमातून भोजनाची व्यवस्था करून देण्यात आली.

या प्रसंगी अॅड. एन. डी. भौतिक, माया भौतिक, अॅड. संघसेन भौतिक, स्नेहा भौतिक, समृद्धी रोडगे, लायन्स क्लबचे श्री. जयस्वाल तसेच रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.