Neet आणि TET पेपर फुटला….सरकारचे अपयश…पेपर फुटी मागे सरकारचाच हात…ओबीसी क्रांती मोर्चाचा आरोप
भंडारा ;- ‘नीट’चा गोंधळ अजून थांबलेला नाही लगेच आता ‘टीईटी’ परीक्षेचाही पेपर फुटल्याने महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पुन्हा एकदा घाला घालण्याचे काम सरकार करीत आहे. ठाण्यात पेपर लीक झाल्याने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली ही केवळ प्रशासनाची चूक नाही तर संपूर्ण व्यवस्थेचे अपयश आहे.वर्षानुवर्षे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीची त्यांच्या आई-वडिलांनी घाम गाळून केलेल्या खर्चाची किंमत या सरकारच्या दृष्टीने शून्य झाली आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.एकामागून एक पेपर फुटत आहेत परीक्षा रद्द होत आहेत तरुणांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे पण सत्ताधाऱ्यांना मात्र खुर्च्या वाचवण्यात जास्त रस दिसून येत असून पक्ष फोडण्यात आणि सत्तेचे गणित जुळवण्यातच अधिकच मजा येत आहे.हा केवळ पेपर लीक नाही तर महाराष्ट्राच्या तरुणाईच्या विश्वासाचा, त्यांच्या स्वप्नांचा आणि त्यांच्या भविष्याचा केलेला विश्वासघात आहे.विद्यार्थ्यांना न्याय हवा दोषींना कठोर शिक्षा हवी. अन्यथा ही तरुण पिढी या अन्यायाचा हिशोब नक्कीच मागेल हे मात्र नक्की आहे.पण मात्र वारंवार पेपर फुटी होत असल्याने यात सरकारचाच हात तर नाही असा आरोप ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी केला आहे.
