General

जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांची आरोग्य उपकेंद्र नवेगावबांध येथे आकस्मिक भेट

 

नवेगाव बांध :-          दि.16 एप्रिल गुरुवारी दुपारी 4.00 वाजता जिल्हाधिकारी माननीय डॉ.मंगेश गोंदावले यांनी अतिदुर्गम अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र नवेगावबांध येथे आकस्मिक भेट देवुन आरोग्य संस्थेमार्फत देण्यात येत असलेल्या आरोग्य सेवा व सुविधाची पाहणी केली.यावेळी त्यांचे सोबत तहसिलदार अनिरुद्ध कांबळे व उमेद बचत गटाचे व्यवस्थापक उपस्थित होते.

 

भेटी दरम्यान आयुष्मान आरोग्य मंदिर नवेगावबांध येथील आरोग्य सेविका माया नागपुरे यांचेशी गरोदरमातांची तपासणी व देण्यात येणार्या आरोग्य सेवा, प्रसुतीसाठी संदर्भित करण्याच्या सेवा,अ‍ॅनेमिया,सॅम/मॅम बालकांना देण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा,अतिजोखमीच्या मातां,बालकांचे नियमित लसीकरण बाबत माहीती घेतली.आशा सेविका यशोधरा डोंगरे यांचेशी संवाद साधुन गावपातळीवरील गृहभेटी दरम्यान देण्यात येत असलेल्या सेवांची माहीती जाणुन घेतली.समुदाय आरोग्य अधिकारी युगा नाकाडे यांचेमार्फत बाह्यरुग्ण तपासणी रजिष्टरची पाहणी केली.

 

भेटी दरम्यान आयुष्मान आरोग्य मंदिर येथील आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता,बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) दरम्यानच्या वेळेत मिळत असलेल्या रुग्ण सुविधा, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा,औषधी साठा ई.विविध बाबींचा आढावा घेवुन रुग्णसुविधा गुणवत्तापुर्वक देणे,सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करण्यात यावी,आरोग्य संस्थाचे रेकॉर्ड अद्यावत करणे,उन्हाळ्यात उष्माघात व साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या