General

तिरोडा तालुक्यातील 247 स्वयंपाकी व मदतनीस यांना प्रशिक्षण 

 

तिरोडा :-      स्थानिक एस डी बी विद्यालयात तिरोडा तालुक्यातील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी व मदतनीस यांना अन्नसुरक्षा व स्वच्छता बाबत प्रशिक्षणाचे आयोजन गटशिक्षणाधिकारी अरुण गिर्हेपुंजे यांचे अध्यक्षतेखाली वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बरीयेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले.

या प्रशिक्षणाला राजू काळे ,पायल हुकरे, योगेश बनछोडे यांनी मार्गदर्शन केले .यामध्ये स्वच्छता व सुरक्षितता कशी राखावी याबाबत विविध उदाहरणे देऊन प्रशिक्षणार्थींना समजावून सांगितले .या प्रशिक्षणामध्ये 247 स्वयंपाकी व मदतनीस यांनी हजेरी लावली .

प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालन राजू काळे, प्रास्ताविक पायल हूकरे, आभार प्रदर्शन योगेश बनछोडे यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वृंदांनी मोलाचे सहकार्य केले.