General

राजेंद्र जैन यांच्या राज्यसभा उमेदवारीनंतर गोंदियात जल्लोष

गोंदिया, दि. __9_ : महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी राज्यसभा सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गोंदिया शहरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यानिमित्त खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या जनसंपर्क कार्यालय, पाल चौक गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भव्य आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

राजेंद्र जैन यांना राज्यसभा उमेदवारी मिळाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवून शुभेच्छा दिल्या. “राजेंद्र जैन साहेबांचा विजय निश्चित आहे” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आनंद व्यक्त केला.

कार्यकर्त्यांनी राज्यसभा उमेदवारीबद्दल पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल्ल पटेल तसेच महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले. राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीमुळे विदर्भासह गोंदिया जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

पाल चौक परिसरात फटाक्यांची आतिषबाजी, घोषणाबाजी आणि मिठाई वाटप करून उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.