शैक्षणिक

गिरजाबाई कन्या महाविद्यालय येथे ‘मुलींच्या विविध कायदेविषयक’ जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी तिरोडा :- तालुका विधी सेवा समिती, तिरोडा यांच्या वतीने गिरजाबाई कन्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तिरोडा येथे विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘मुलींच्या विविध कायदेविषयक’ मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना बालकांचे हक्क, संरक्षण, बालकांशी संबंधित विविध कायदे तसेच कायदेशीर मदत व विधी सेवा याबाबत एड. सुप्रिया वासनिक यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक राहावे तसेच कोणत्याही प्रकारच्या अन्याय अथवा अडचणीच्या प्रसंगी कायदेशीर मदत घेण्यास पुढे यावे, याबाबत यावेळी आवाहन करण्यात आले.

सदर कार्यक्रमात इंडिया टेक्निकल इंस्टिट्यूट, तिरोडा च्या संचालिका अर्चना नखाते, यांनी सायबर आणि एआय बद्दल मार्गदर्शन केले. यावेळी पीएलवी धम्मदीप शहारे, सुषमा मून, दीपिका लांजेवार, उषा खोब्रागडे, वैशाली रामटेके आणि रसिका उके प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुका विधी सेवा समिती, तिरोडा यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण होण्यास निश्चितच मदत झाली.