उपजिल्हा रुग्णालयात संविधान प्रास्ताविकेचे लोकार्पण रुग्णांना फळ व बिस्किटांचे तर नवजात शिशुना ड्रेस केले वितरण..!
तिरोडा प्रतिनिधी:-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच तिरोडा च्या वतीने उपजिल्हा रुग्णालय येथे संविधान प्रास्ताविकेचे लोकार्पण, रुग्णांना फळ, बिस्केटचे वितरण, व नवजात शिशुना ड्रेस वाटप माजी आमदार भजनदास वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल शेंडे, डॉ. संजय भगत, प्रा. दिवाकर गेडाम, रत्नाकर नंदागवळी, विजय खोब्रागडे, सुधीर मेश्राम, रणजीत काणेकर, राजकुमार मेश्राम, पी. जी. मेश्राम, प्रदीप मेश्राम , टी. एम. वैद्य, राहुल बडगे, सौ. दीपा राहुल बडगे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. घटनेचा प्रास्ताविकेचे लोकार्पण मान्यवरांच्या वतीने करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गुणगौरव करून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संविधान प्रास्ताविकेची प्रतिमा भेट देणारे आयु.राहुल बडगे यांचे सत्कार माजी आमदार भजनदास वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ व बिस्किटांचे वितरण व नवजात शिशुना ड्रेस वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन टी. एम. वैद्य तर आभार प्रदीप मेश्राम यांनी मानले.
याप्रसंगी महाप्रज्ञा बौद्ध विहार समितीचे अध्यक्ष महेंद्र बडगे, उपाध्यक्ष लंकेश टेंभेकर, संघटक पवन वासनिक, कोषाध्यक्ष संजय जांभुळकर, सल्लागार सुरेश बन्सोड, सचिव प्रवीण चव्हाण, मनिंद्र बनसोड, पवन वाघमारे आदी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील नर्सिंग ऑफिसर शॉर्लेट भांडारकर, आरती रहांगडाले, अक्षय साठे, सचिन मेश्राम, लिलाधर कुसुराम, अनमोल लोखंडे आदींनी मोलाचे सहकार्य केले..
