General

स्व. शंकरलाल अग्रवाल कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा बारावीचा निकाल शंभर टक्के

 

गोंदिया : प्रताप मेमोरियल चेरिटेबल ट्रस्टद्वारे संचालित स्वर्गीय शंकरलाल अग्रवाल कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, सुर्या टोला गोंदिया येथील विद्यार्थ्यांनी नागपूर विभागीय शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.

या परीक्षेत नीर डोरले याने 78.17 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. तर कणक मेश्राम हिने 75.85 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच सिद्धी हिरापुरे हिने 75.50 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव प्रफुल्ल अग्रवाल, महाविद्यालयाचे प्राचार्य ए. एस. शेख तसेच प्रशासकीय अधिकारी विजय मदनकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी रूपा मेश्राम, प्रवीण रोहनकर, स्वाती बहरे, नेहा जैतवार, वैभव मिश्रा, जितेंद्र गायधने, श्याम शेंडे, डीलेश्वर रंहागडाले, तसेच अंजिरा नागपुरे आदींनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.