जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या तक्रारी वाढल्या..!
राज डाहाट /गोंदिया :- शहर व ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची उलाढाल होत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या दारूबंदी विभागाचे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची बाब पुढे आली आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या गैरव्यवहारा प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक गोंदिया- तिरोडा यांची तक्रार देखील करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भाग असलेल्या देवरी परिसरात सुद्धा सदर प्रकरण मागील दोन ते अडीच वर्षापासून अनधिकृतपणे व्यापार चालत आहे मात्र सदर अधिकाऱ्यांच्या डोळेझाकपणामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे.
गोंदिया शहरातील एका बारमध्ये अवैधरित्या टीपी शिवाय विक्री करण्यात आलेला आठ ते दहा लाखांचा मुद्देमाल आढळला होता त्याविषयी कोणतीही कारवाई न करता आपसी संगणमताने साटे लोटे करून विल्हेवाट लावण्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे. तसेच नवीन बियर बारचे परवाने देण्यासाठी अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने परवाने दिल्याच्या चर्चाही जोर धरू लागल्या आहेत.
मागील दोन ते अडीच वर्षांमध्ये जिल्ह्यात अनेक ठिकाणी बियर बार, देशी दारू भट्टी, वाईन शॉप आदीचे परवाने दिले आहेत त्याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी अशी मागणी सामान्य जनतेकडून होत आहे. याविषयी पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही, यापुढे अशी माहिती मिळाल्यास कारवाई करू असे सांगितले.
या अधिकाऱ्यांच्या बदलांच्या सत्र सध्या सुरू असल्याने जिल्हा बदलीसाठी अहोरात्र प्रयत्न करत असल्याचे परिसरात चर्चा आहेत. तेव्हा जोपर्यंत अशा अधिकाऱ्यांची चौकशी परिपूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना बदली आदेश देण्यात येऊ नये अशा चर्चाही जोर धरू लागले आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे जिल्ह्यात दारूबंदी विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

Pingback: how to buy androxal price canada
Pingback: how to order rifaximin uk online
Pingback: kamagra à un prix inférieur
Pingback: purchase enclomiphene canada medicine
Pingback: buy cheap flexeril cyclobenzaprine purchase online from canada
Pingback: how to order dutasteride generic how effective
Pingback: how to buy gabapentin uk online pharmacy
Pingback: get fildena price in us
Pingback: online order itraconazole generic best price
Pingback: get staxyn retail price
Pingback: cash for avodart
Pingback: nízký testosteron a kamagra