गुन्हेगारी बातमी

गावातील कायदा व सुव्यवस्थेची देखरेख करत असताना तंटामुक्त समिती अध्यक्षांवर लाठीने मारहाण..! 

 राज डाहाट/गोंदिया :-  मागील काही दिवसांपूर्वी नागपंचमी सणानिमित्त गावात शाळकरी मुलांना सुट्टी असून इतरत्र काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घेण्याच्या उद्देशाने ग्राम शिरपूर येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष सुखचंद पटले(60) हे गावात फेरफटका मारत असताना चौकातील किराणा दुकानात आरोपी सट्टा जुवा खेळत असल्याचे निदर्शनास आले असता तंटामुक्ती अध्यक्ष या नात्याने त्यांनी सदर आरोपींना हटकले.त्यावेळी आरोपींनी “तू कोण होता है हमको रोकनटोकनेवाला” असे बोलत भर चौकात सर्वांसमोर अश्लील शिवीगाळ केली तसेच काठीने मारहाण केली यामध्ये मुख्य आरोपी माजी सरपंच अशोक दीना मेंढे, हेमराज जीआलाल रहांगडाले, कपूर भैयालाल रहांगडाले व इतरांन विरुद्ध दिनांक 19 जुलै रोजी पोलीस स्टेशन रावणवाडी येथे भारतीय न्याय संहिता 118 एक, 352, 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या गुन्ह्याच्या अनुषंगाने योग्य तपास होत नसल्याचे लक्षात येताच फिर्यादी ने पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून जिल्हा पोलीस अधीक्षकांना आपली आपबीती सुनावली.

 

तंटामुक्त समितीचे उद्देश व निर्मिती

ग्रामीण भागात वाढत असलेल्या गुन्हेगारी ला आळा घालण्यासाठी तसेच किरकोळ प्रकरणाचा गावातच न्यायनिर्वाळा करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रामध्ये “महात्मा गांधी तंटामुक्त अभियान” हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यांपासून प्रवृत्त करण्यासाठी अस्तित्वात आले आहे. 15 ऑगस्ट 2007 पासून या योजनेची सुरुवात झाली. या समितीचा मुख्य उद्देश ग्रामपातळीवर तंटे समोपचाराने मिटवणे आणि गावात शांतता प्रस्थापित करणे हा आहे.

या उद्देशाच्या परिपूर्णतेसाठी मागील पंधरा वर्षापासून फिर्यादी हे निस्वार्थ भावनेने सतत कार्यरत असून गावात दारूबंदी तसेच सट्टाबंदी करून गावात शांतता प्रस्थापित केली आहे मात्र सदर प्रकरणामुळे गावातील जनतेच्या मनात हळहळ व्यक्त होत आहे.

 

ग्रामविकासासाठी तंटामुक्त समितीची गरज

त्यामुळे गावात सलोखा राखत गावच्या विकासाचा गाडा अविरतपणे चालवण्यासाठी ज्या शांततामय वातावरणाची गरज असते ते टिकवून ठेवणाऱ्या तंटामुक्ती अध्यक्षांनाच गावातील राजकारणी लोक भर चौकात लाठ्याकाठाने मारहाण करत असतील तर गावातील इतर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर बनला आहे व स्थानिक पोलीस प्रशासन त्याविषयी किती गंभीर आहे याचे ज्वलंत उदाहरण म्हणून शिरपूर येथे घडलेल्या घटनेचा उल्लेख केला जाऊ शकतो.

यापुढे गावात कायदा व सुव्यवस्था टिकून राहणार की नाही याबाबत गावकऱ्यांच्या मनात शंका व्यक्त केली जात आहे.

या गुन्ह्याविषयी झालेल्या तपासात समाधान झाले नाही तर यापुढे उपोषणाला बसण्याचा इशारा देखील पीडित तंटामुक्त अध्यक्षांनी दिला आहे.

13 thoughts on “गावातील कायदा व सुव्यवस्थेची देखरेख करत असताना तंटामुक्त समिती अध्यक्षांवर लाठीने मारहाण..! 

Comments are closed.