विदर्भ

हलबिटोला / पांढरी येथे आदि कर्मयोगी अभियान साजरा..!

 

देवरी/गोंदिया :- “आदि कर्मयोगी” या केंद्र शासनाचे अभियान संपुर्ण भारतात राबविण्यात येत आहे. “आदि कर्मयोगी” अभियानाचा उद्देश आदिवासी पाडयांतील नागरिकांकडून ग्रामविकास आराखडा तयार करवून घेऊन गावातील कामकाजाला दिशा देणे आणि विविध विकासकामांची अंमलबजावणी करणे हा आहे. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DA-JGUA) योजने अंतर्गत आदिवासी क्षेत्रात योजनेचे संपृक्तता साधण्याच्या दृष्टीने विविध विभागांशी समन्वय साधून केंद्र शासनाने जनजाती कार्यमंत्रालय यांचे मार्फत “आदि कर्मयोगी” अभियान अंतर्गत देशभरात आदिवासी नेतृत्वाची एक गतिशिल टिम विकसित करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनजातीय कार्य मंत्रालयाने “आदि कर्मयोगी-उत्तरदायी शासन” या कार्यक्रमाची राष्ट्रीय पातळीवर अंमलबंजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर कार्यक्रमाचा उद्देश आदिवासी समुदायाच्या विकासासाठी उत्तरदायी शासन व्यवस्था उभारणे हा आहे. “आदि कर्मयोगी” अभियान हे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या योजनेच्या व्यापक आराखडयाशी जोडण्या आला आहे.

“आदि कर्मयोगी” अभियानाअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 104 गावांचा समावेश आहे. या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील आदिवासींना वैयक्तिक लाभ तसेच गांव पातळीवर सामुहिक लाभ 100% संपृक्तता करण्याचे उद्दिष्ट आहे. सडक/अर्जुनी तालुक्यातील पांढरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या हलबीटोला या गावाचे समावेश आहे. हलबीटोला इथे भेट देवून सभा/कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर भेटी दरम्यान गावातील सरपंच रामलाल शोभीलाल नाईक, उपसरपंच मनोहर बागळकर, पोलीस पाटिल अनिल देवाजी मेंढे, ग्रामपंचायत अधिकारी भाष्कर एस. झोडे, तलाठि मधुकर नकटू टेंबुनिकर, कृषी अधिकारी सी.एम.ठवरे, युवा नेते सुनिल देवाजी मेंढे, गौरव सेवक कवास, अंगणवाडी सेवीका श्रीमती प्रमिला धनलाल मडावी,  सोहनलाल वी.कापगते (शिक्षक), रोशनाताई भाजीपाले तसेच आदि सहयोगी, आदि साथी व गावातील प्रतिष्ठित नागरीक, युवक व युवती यांच्या उपस्थितीत गांवा-गांवामध्ये जावून ग्रामसभा घेण्यात आली तसेच गांवातील लोकांकडून नकाशा काढण्यात आला, शिवारफेऱ्या काढण्यात आल्या व ग्रामकृती आराखडा तयार करण्यात आला.