साहित्य

मुन्नाभाई नंदागवळी यांच्या पळसफूलांचा धम्मसोहळा काव्यसंग्रहाचे प्रकाशन थाटात..!

 

विविध मान्यवर उपस्थित : जिल्हास्तरीय साहित्य व संस्कृती संमेलन 

 

अर्जुनीमोरगाव : 

तालुक्यातील प्रसिद्ध कवी व आंबेडकरवादी साहित्याचे अभ्यासक मुन्नाभाई नंदागवळी यांच्या पळसफूलांचा धम्मसोहळा काव्यसंग्रहाचे मोठ्या थाटात प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी मंचावर संमेलनाध्यक्ष डॉ सदानंद बोरकर, संमेलनाचे उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कार विजेते परभणीचे प्रसिद्ध साहित्यिक डॉ. आसाराम लोमटे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे, सिंधूदुर्ग येथील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉ. प्रविण बांदेकर, प्रसिद्ध समीक्षक व साहित्यिक सिंधूदुर्गचे डॉ. गोविंद काजरेकर, संस्थाध्यक्ष लुणकरण चितलांजे, संस्थासचिव मुकेश जायस्वाल स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. ईश्वर मोहूर्ले, जेष्ठ लेखक व समीक्षक प्राचार्य डॉ. श्याम मोहोरकर प्रा. श्रीकांत नाकाडे व नंदकिशोर राठी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

मुन्नाभाई नंदागवळी हे आंबेडकरवादी कवी आहेत. त्यांचे अनेक साहित्य प्रकाशित झाले आहे. संशोधन पेपर, लेख, नाट्य समीक्षा लिहिले आहे. त्यांना अनेक पुरस्कार व मानसन्मान मिळाले असून ते संबध महाराष्ट्रात ओळखले जातात. समाजात अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावत असतात.

शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयात जिल्हास्तरीय पहिले झाडीपट्टी साहित्य व संस्कृती संमेलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये प्रसिद्ध कवी मुन्नाभाई नंदागवळी यांच्या पळसफूलांचा धम्मसोहळा काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. आशिष कापगते यांनी केले तर आभार संमेलन संयोजक प्रा डॉ शरद मेश्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.