भंडारा जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न; खासदार प्रफुल पटेल यांनी दिला विकासकामांवर भर
भंडारा :- जिल्हा नियोजन सभागृह, भंडारा येथे जिल्हा नियोजन समितीची सभा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी खासदार श्री प्रफुल पटेल, खासदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री परिणय फुके, आमदार श्री राजूभाऊ कारेमोरे, आमदार श्री नरेंद्र भोडेकर, आमदार श्री अविनाश ब्राह्मणकर, जिल्हाधिकारी श्री सावनकुमार तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सभेदरम्यान खासदार श्री प्रफुल पटेल यांनी भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण विषय मांडले. जिल्ह्यातील विकासकामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेचे नियोजन याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या कामांची तातडीने अंमलबजावणी करावी, प्रलंबित विकासकामांना गती देणे, पायाभूत सुविधा मजबूत करणे तसेच नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
