गुन्हेगारी बातमी

अवघ्या साठ रुपयांसाठी आरोपीने दाबला मित्राचा गळा!

गोंदिया:- समाज जीवनात घडत असलेल्या अनेक लहान सहान गोष्टी किती मोठ्या घटनेचे स्वरूप घेऊ शकतात याचे ज्वलंत उदाहरण जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम बोदा येथे घडली. याबाबत सविस्तर असे की, दोन मित्र आपसात बसून पैशाच्या देवान घेवाण बाबत चर्चा करीत असताना आरोपीचे मृतकावर उसने असलेले साठ रुपये परतवण्यासाठी आरोपीने मागणी केल्यास मृतक सायंकाळी फोन पे ने परत करतो असे बोलला, त्यावर आरोपीला विश्वास नसल्यामुळे त्याने मृतकाचा गळा आवळला त्यात मृतक हा बेशुद्ध होऊन खाली कोसळला, त्यानंतर लगेच त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र दवनीवाडा येथे हलविण्यात आले व तेथून पुढे उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे हलविण्यात आले परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. ही घटना (दि. 8 ऑक्टो) रोजी चार वाजे दरम्यान ग्राम बोदा येथे घडली. या घटनेची माहिती मिळताच दवनीवाडा पोलिसांनी तातडीने दखल घेऊन सदर घटनेची तपास कार्य प्रगतीवर आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिली.