बारा गावांना पाणी मिळण्याचा मार्ग झाला मोकळा आमदार राहांगडाले यांच्या प्रयत्नांना यश
तिरोडा तालुक्यात पुन्हा सिंचनाची वाढ, आमदार विजय रहांगडाले यांच्या माध्यमातून खैरबंदा जलाशयामार्फत सिंचन होत नसलेल्या १२ गावांना पाणी मिळण्याकरिता ३००.०० कोटी रुपये निधीतून उपसा सिंचन योजनेला मंजुरी.
तिरोडा:- धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२, या योजनेतून वैनगंगा नदीवर गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात कवलेवाडा गावाजवळ बंधारा बांधून साठविण्यात येणा-या पाण्याचा उपसा करुन १५ अस्तित्वातील तलावामध्ये टाकण्याचे प्रस्तावित आहे. त्याद्वारे गोंदिया जिल्हयातील ५ तालुक्यातील (तिरोडा, गोंदिया, गोरेगाव, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी) तसेच भंडारा जिल्ह्यातील ३ तालुक्यातील (मोहाडी, लाखांदूर, साकोली) ६१७४४ हे. सिंचन क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळून ९०१४६ हे. सिंचन क्षमता निर्मित होणार होती सदर प्रकल्पाचा ५२१७.९२ कोटी किंमतीचा प्रथम सुप्रमा प्रस्ताव विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांचे दिनांक १६/०२/२०२४ अन्वये मंजुर झालेला आहे.धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-१ अतंर्गत खैरबंधा जलाशयात धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा -१ अतंर्गत सन-२०१८ पासनु पाण्याचे भरणा करुन सिंचन करण्यात येते. परंतु तेव्हापासुन आजपर्यंत ७ वर्षात टेल भागातील १२ गावांना अदांजे २००० हेक्टर क्षेत्राला रबी/उन्हाळी हंगामात सिंचनाचे पाणी देण्यात आले नाही. तसेच टप्पा-१ मध्ये खरैबंधा जलाशयाचे ५५९६ हेक्टर सिंचन क्षेत्रापैकी उन्हाळी हंगामात फक्त १३१५ हेक्टर क्षेत्र घेण्यात येते. त्यामुळे शिर्ष भागाव्यतिरीक्त टेल भागातील १२ गावांना दरवर्षी सदर हंगामात सिंचनापासनू वंचित राहावे लागते. या प्रकल्पावरिल डावा मुख्य कालव्याची एकुण लांबी ३२.०० कि.मी. असून सिंचनांअभावी सद्यस्थितीत सदर कालव्यावरील काही भागातील निवडक क्षेत्रास सिंचन होते.
सद्यस्थितीत अर्जुनी गावापर्यंत प्रकल्पाचे पाणी खरीप हंगामात १ किंवा २ पाळी करिता पाणी उपलब्ध होते, परंतू रब्बी/उन्हाळी हंगामामधे आजपर्यंत अजीबात पाणी मिळाले नाही. अनेक वर्षे सावरा, चांदोरी व पिपरिया गावात सिंचनाचे पाणी न मिळाल्यामुळे याभागातील कालवा पूर्णतः बुजलेला आहे. तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, यांनी खैरबंधा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या टेल भागातील गावांना सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाइन द्वारे धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२ मधून पाण्याची मागणी बाबत ०९/०२/२०२६ रोजी खैरबंधा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या टेल भागातील गावांना सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी उर्ध्व नलिके द्वारे धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२ मधुन पाण्याची मागणी बाबत मा. ना. श्री. गिरीषजी महाजन, मंत्री जलसंपदा विभाग यांनी सदर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विभागास दिले होते. खैरबंधा डाव्या कालव्याच्या टेल भागातील गावांना सिंचनाकरीता १२ ग्रामपंचायत कार्यालयाची मागणी तसेच विजय रहांगडाले, आमदार, तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्र यांची धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२ अंतर्गत खैरबंधा तलावाच्या टेलवरील भागातील शेतक-यांना सिंचनाकरीता पाणी देण्याकरीता उपसा सिंचन योजनेचे कामाचे सर्वेक्षण व संकल्पन तयार करण्याचे काम समाविष्ट करण्यात आले त्या अनुषंगाने सविस्तर सर्वेक्षण करण्याचे काम करण्यात आले असून धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२ अंतर्गत ९०१४६ हेक्टर सिंचन क्षमता प्रस्तावित करण्यात आली होती.
त्या अनुषंगाने खैरबंधा मध्यम प्रकल्पाच्या शेवटच्या भागातील गावांना पाणी मिळण्याकरिता धापेवाडा उपसा सिंचन योजना धरणावर जॅकवेल बनवून सदर पाणी उपसा करून करटीगावाजवळ खैरबंदा जलाशयातून १८ कि.मी.वर सोडण्यात येईल व १८ किलोमीटरनंतर वितरण कुंड तय्यार करून खैरबंदा जलाशयाच्या माध्यमातून वितरण व्यवस्था हयातीत असलेल्या नहराच्या माध्यामतून १२ गावांना शेतीच्या सिंचनाकरिता पाणी सोडण्यात येईल यामध्ये प्रामुख्याने बोरा,परसवाडा,बघोली, अर्जुनी,सावरा,पिपरिया,चांदोरी,खैरलांजी,बिहरीया,इंदोरा बूज., करटी बुज., करटी खुर्द या गावांचा समावेश असून या गावांना उपसा सिंचन योजनेद्वारा सिंचनाकरिता खरीप व रबी हंगामाकरिता पाणी देण्यात येणार असून ह्या योजनेतून सदर नहरांचे सिमेंटीकरण, नुतनीकरणाची कामे होणार आहे या कामाकरिता ३००.०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून आमदार महोदयांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांचे आभार मानले असून सदर कामामुळे २०१६ हेक्टर शेती हि सिंचनाखाली येणार आहे.
