स्पर्धा परीक्षेत टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यासात सराव व सातत्य ठेवले पाहिजेत -प्राचार्य डी आर गिरीपुंजे
–एन. एम. एम. एस. परीक्षेत भिवरामजी विद्यालयाने घेतली गगनभरारी .
– दहा विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळणार चार वर्षात 48000 रुपये.
तिरोडा– विद्यार्थ्यांच्या चांगल्या कामांना प्रोत्साहन दिले पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या कामाची आवड निर्माण होईल. आजची युग हे ए- आय, चाट जीपीटी ,जेमिनी, संगणकाचे युग मानले जाते. यात स्पर्धेला अनन्य साधारण महत्व आहे .शालेय अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाची सवय लावावी. आयएएस, आयपीएस सारख्या स्पर्धा परीक्षा लाखो विद्यार्थी देतात, त्यातून फारच अल्प प्रमाणात विद्यार्थी यशस्वी होतात. स्पर्धा परीक्षेत टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यासात सराव व सातत्य ठेवले पाहिजेत असे मत अध्यक्षीय स्थानावरून प्राचार्य डी. आर. गिरीपुंजे यांनी भिरावमजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील आयोजित एन एम एम एस मध्ये शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात व्यक्त केले.
भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग आठवीचे 10 विद्यार्थी एन एम एम एस परीक्षेत नुकत्याच लागलेल्या निकालावरून शिष्यवृत्ती पात्र झालेले आहेत. त्यांना वर्ग 9 ते 12 वी पर्यंत चार वर्ष प्रत्येक वर्षी 12000 प्रमाणे 48000 रुपये मिळणार आहेत. विद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम ठेवली असून, एन एम एम एस परीक्षेत गगनभरारी घेतलेली आहे. त्या यशस्वी दहा विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ विद्यालयाचे प्राचार्य डी.आर. गिरीपुंजे यांचे अध्यक्षतेखाली, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता भोयर यांचे हस्ते आरोग्य सेविका मेघा शंभरकर , विद्यार्थ्यांचे पालक अशोक बावणे ,होमचंद बिसेन, सुरेश बोपचे,महेंद्र मेश्राम ,सुखदेव कटरे ,रोशनी कटरे ,रत्नमाला कोसरे, सरिता बोपचे, रीना पटले, दसाराम गौतम ,सीमा गौतम यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला .
यावेळी डॉक्टर संगीता भोयर यांनी विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेबद्दल त्यांचे, विद्यालयाचे शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे भरभरून कौतुक केले तर विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत, पालकांचे सहकार्य ,शिक्षकांचे परिश्रम व मुख्याध्यापकांचे नियोजन यातूनच शाळेची प्रगती होत असते. विद्यार्थ्यांनी पुढील वर्षी अशीच व अधिक प्रगती करावी असे आवाहनही यावेळी केले .
या दहा शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांमध्ये लक्ष दसाराम गौतम ,समीक्षा सुरेश बोपचे, नेहा अविनाश हटवार ,सोनल खेमराज ठाकरे ,स्वर्णा अशोक बावणे ,खूषी संतोष कोसरे ,सिद्धी होमचंद बिसेन,आर्या सुखदेव कटरे, अथर्व महेंद्र मेश्राम, मुस्कान किशोर पटले यांच्या समावेश आहे.
या सत्कार कार्यक्रमाचे संचालन विवेककुमार बन्सोड आभार प्रदर्शन आर एस मेश्राम यांनी केले. यशस्वीतेसाठी स्पर्धा परीक्षा प्रमुख जी एन बिसेन, एस पी भगत ,ए बी राठोड ,जे सी लांजेवार ,एस पी टेंभरे ,उत्कर्ष बोरकर ,नंदा बोरकर ,नामदेव अटकुलवाड ,गायत्री बिसेन ,एस एम कटरे ,अनिता उपरीकर, व्ही व्ही मेश्राम, रोशनी बिसेन, शुभांगी पटले ,शिरीन भारतकर ,संगीता वालदे, विनोद धावडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
