शहारवानी जिप क्षेत्रात गारपीट–अतिवृष्टीचा कहर!
प्रति हेक्टर 1.20 लक्ष मदत देन्याची जितेन्द्रकुमार कटरे यांची मागणी
गोरेगाव, प्रतिनिधी:- गोरेगाव तहसील अंतर्गत येणाऱ्या शहारवाणी , सोनी आणि कुराडी जिल्हा परिषद क्षेत्रात ५ जून २०२६ रोजी झालेल्या अवकाळी पावसासह भीषण गारपीटीने अक्षरशः थैमान घातले असून, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. काही तासांच्या या नैसर्गिक आपत्तीने उभ्या पिकांचा चक्कनाचूर करत अनेक शेतकऱ्यांना उघड्यावर आणले आहे. शेतात नजर टाकली असता “दाणा नाही, फक्त विध्वंस” असे भयावह चित्र दिसून येत आहे.
भाताचे उन्हाळी पीक, रब्बी हंगामातील पिके तसेच फळबागा यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत. गारपीटीच्या तडाख्याने शेतातील पिके जमिनदोस्त झाली असून, काही गावांमध्ये घरांची छप्परे उडून भिंती कोसळणे अशा घटना घडल्याने नागरिकांवर दुहेरी संकट कोसळले आहे.
तिरोडा–गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय राहांगडाले तसेच शाहरवानी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर जितेंद्रकुमार कटरे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी बाधित भागांना तातडीने भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
“शेतकऱ्यांचे नुकसान प्रचंड आहे. प्रशासनाने कोणतीही ढिलाई न करता तातडीने पंचनामे पूर्ण करावेत,” असे स्पष्ट निर्देश आमदार यानी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पाहणीदरम्यान तहसीलदार व महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
डॉ.जितेन्द्रकुमार कटरे यानी शेतकऱ्यांसाठी ठाम भूमिका घेत ८ दिवसात संपूर्ण शेतकार्यांचे पंचनामे करुण 30 दिवसाच्या आत हेक्टरी १.२०लक्ष नुकसान भरपाई देन्याची मागनी करुण आमदार विजय राहंगडाले तसेच तहसीलदार प्रज्ञा भोकरे याना पुरगांव येथिल शेतकारी खीरेकर यांच्या शेतातील नाश झालेल्या धानाची पेंडी दाखावली
शहारवाणी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कटरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी शुद्धा तीव्र संताप व्यक्त केला.
आमचे सर्वस्व वाहून गेले आहे. कर्ज, खर्च आणि आता हे नुकसान… आम्ही जगायचे कसे? अशा व्यथा मंडल्या.यावेडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
